News Flash

बेस्टचे हजार कर्मचारी कर्करोगाचे संशयित

आतापर्यंत पाच हजार कर्मचाऱ्यांची तंबाखू सोडवण्यात यश आल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले.    

संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या तीन वर्षांत बेस्टमधील तंबाखू सेवन करणाऱ्या ३ हजार ३३ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात १,३३३ कर्मचारी कर्करोगाचे संशयित असल्याचे आढळले असून यातील एकाला तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे.

बेस्ट उपक्रमाकडून वडाळा आगारातील तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने बेस्टने तंबाखूमुक्त अभियानाचा कार्यअहवाल सादर केला. त्या अहवालात तंबाखूचा वापर करणाऱ्या कर्मचारी आणि कर्करोगाचे संशयित रुग्ण याची माहिती देण्यात आली. २०१६-१७ पासून ते आतापर्यंत टाटा कर्करोग रुग्णालय आणि इंडियन कॅन्सर सोसायटीने बेस्टमधील १२ हजार २८९ जणांची तपासणी केली. यामध्ये ३ हजार ३३ कर्मचारी तंबाखूचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. यातील १ हजार ३३३ जण मौखिक कर्करोगाचे संशयित रुग्ण आढळले आणि ९९३ जणांची बायोप्सी करण्यात आली आणि ३४० जणांची बायोप्सी करणे बाकी असल्याचे सांगितले. त्यांच्यापैकी एकाला कर्करोग झाल्याचे निदान आहे. आतापर्यंत पाच हजार कर्मचाऱ्यांची तंबाखू सोडवण्यात यश आल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले.

वडाळा आगारात झालेल्या तंबाखू विरोधी अभियानाला बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर, बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य, इंडियन कॅन्सर सोसायटीचे सहयोगी संचालक डॉ. अर्जुन शिंदे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 4:26 am

Web Title: 1000 best workers suspected of cancer
Next Stories
1 अति गंजल्यानेच हिमालय पूल कोसळला
2 करी रोड, चिंचपोकळी पूल धोकादायक
3 चुकीच्या खात्यात पैसे जमा केल्याप्रकरणी बँकेला दंड
Just Now!
X