News Flash

करोना वाढीचा दर १.९१ टक्क्यांवर

मुंबईत १०,४२८ नवे रुग्ण, तर २३ जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईमधील करोना वाढीचा दर १.९१ टक्क्यांवर पोहोचला असून ही बाब पालिकेसाठी चिंतेची बनली आहे. दरम्यान, बुधवारी १० हजार ४२८ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली आहे, तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत नव्या बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बुधवारी १० हजार ४२८ जणांना बाधा झाल्यानंतर एकूण रुग्णसंख्या चार लाख ८२ हजार ७६० वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १४ पुरुष आणि नऊ महिलांचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी १६ जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमधील एकाचे वय ४० वर्षांखालील तर १७ जणांचे वय ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित पाच जण ४० ते ६० वयोगटातील होते. आतापर्यंत ११ हजार ८५१ मुंबईकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले.विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ६,००७ रुग्ण बुधवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

आतापर्यंत तीन लाख ८८ हजार ०११ रुग्ण करोनामुक्त झाले आहे, मात्र रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही कमी होऊन ८० टक्क््यांवर स्थिरावले आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये ८१ हजार ८८६ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईमधील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी ३५ दिवसांवर घसरला आहे, तर रुग्णवाढीच्या दराने १.९१ टक्क््यांवर उसळी घेतली आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी बुधवारी तब्बल ५१ हजार २६३ चाचण्या करण्यात आल्या.

१,०३७ जणांचे संस्थापक विलगीकरण

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील ३५ हजार ८४० संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला असून यापैकी १,०३७ संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित संशयित रुग्णांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह््यात ६,२९० करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह््यात बुधवारी ६ हजार २९० करोना रुग्ण आढळून आले. तर २१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह््यातील करोनाबाधितांची संख्या ३ लाख ५६ हजार २६७ झाली असून मृतांची संख्या ६ हजार ६२० झाली आहे. जिल्ह््यातील ६ हजार २९० करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ हजार ७२८, ठाणे महापालिका क्षेत्रात १ हजार ६१९, नवी मुंबईत १ हजार ४१६, मीरा-भाईंदर ५२२, अंबरनाथ ३०४, बदलापूर २४०, उल्हासनगर १७३ भिवंडी १४८ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १४० रुग्ण आढळून आले. तर २१ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. यात ठाणे पाच, नवी मुंबई चार, कल्याण-डोंबिवली तीन, मीरा-भाईंदरमध्ये तीन, उल्हासनगर दोन, भिवंडी दोन, अंबरनाथ एक आणि बदलापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:44 am

Web Title: 10428 new patients in mumbai abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन
2 संचारबंदीतही खाद्यपदार्थ घरपोच
3 व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचे पाठबळ
Just Now!
X