News Flash

दिवाळीच्या पाच दिवसांत ४७ घरांतील ‘दिवे’ विझले!

रेल्वेमार्गावरील अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनीही स्वत:च्या जिवाची काळजी घेणे आवश्यक आहे.

मृतांमध्ये केवळ दोन महिलांचा समावेश असून यातील बहुतांश अपघात रेल्वे रूळ ओलांडताना झाल्याची नोंद आहे.

गेला आठवडाभर सगळी मुंबापुरी दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघाली असताना शहर व उपनगरांतील तब्बल ४७ घरांतील ‘दिवे’ रेल्वेमार्गावरील अपघातांत विझले. ९ नोव्हेंबरपासून भाऊबिजेच्या दिवसापर्यंत म्हणजेच १३ नोव्हेंबपर्यंत रेल्वेमार्गावर एकूण १०७ अपघातांत ४७ जण ठार, तर ६० जण जखमी झाले. मृतांमध्ये केवळ दोन महिलांचा समावेश असून यातील बहुतांश अपघात रेल्वे रूळ ओलांडताना झाल्याची नोंद आहे.
रेल्वेमार्गावरील अपघात रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस, रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करीत असूनही रेल्वे अपघातांत दर दिवशी सरासरी १० मृत्यू होतात. यातील बहुतांश मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाल्याचेही निदर्शनास आले आहे. रेल्वे व एमआरव्हीसी यांनी एकत्रितपणे संवेदनशील स्थळांचा अभ्यास करून त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याचा आराखडाही तयार केला आहे. मात्र तोपर्यंत रेल्वेमार्गावरील मरणसत्र चालूच आहे. यंदा ९ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या दिवाळीच्या सणादरम्यान तब्बल ४७ जण या रेल्वे अपघातांत दगावले. यात सर्वाधिक म्हणजे ९ मृत्यू ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत झाले. त्याखालोखाल कुर्ला आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेवर हे प्रमाण अंधेरी आणि बोरिवली येथे प्रत्येक चार मृत्यू एवढे होते. जखमींच्या बाबतीत कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० जखमी, कल्याण ७, मुंबई सेंट्रल ६, अंधेरी ५ या रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अधिक जखमींची नोंद झाली.
रेल्वेमार्गावरील अपघात टाळण्यासाठी प्रवाशांनीही स्वत:च्या जिवाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे हेदेखील जागरूकता मोहीम राबवत आहेत. दोन स्थानकांदरम्यान प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडणे टाळायला हवे. तसेच प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठीही पुलाचा वापर करावा, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या दरम्यान अशा घटना घडल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.

मृत्यू जखमी
९ नोव्हेंबर ०९ १४
१० नोव्हेंबर १० १४
११ नोव्हेंबर १२ ११
१२ नोव्हेंबर १० १२
१३ नोव्हेंबर ०६ ०९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 1:38 am

Web Title: 107 railway accidents in diwali festiwal
Next Stories
1 बागांना आता ‘वामकुक्षी’ नाही!
2 ‘एमयुटीपी-३’साठी राज्यसरकार प्रयत्नशील
3 मोबाइलमधील गुगल सर्चमध्ये फेसबुक पोस्टही!
Just Now!
X