18 September 2020

News Flash

आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे मार्गावर 11 तासांचा महाब्लॉक

मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही

लोकसभा निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खूशखबर दिली आहे.

लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल ११ तासांचा महाब्लॉक असणार आहे. आज रात्री १० वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच रविवारी 3 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही.

लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी 2 फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४० टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने या दिवशी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. यासाठी 2 फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.

शिवाय, या मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेसमधील वेळेत बदल होईल. लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईल पूल गंजल्याचे स्पष्ट झाल्याने पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल बंद होता.

प्रवाशांसाठी जादा बसेस –
मेगाब्लॉकच्या या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहेत. बेस्टचे प्रवक्ते बी.ए.झोडगे यांनी ही माहिती दिली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बसगाडया सोडण्यात येणार आहेत. या बसेस चर्चगेट ते दादर स्थानका दरम्यान धावतील. मरीन लाईन्स, चर्नीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर थांबा घेतील.

शनिवारी रात्री ९.३० ते रात्री १.३० वाजेपर्यंत या विशेष बस धावतील. त्यानंतर पहाटे ३.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी दोन फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४० टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने या दिवशी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 7:13 am

Web Title: 11 hours megablock on western railway line
Next Stories
1 रेल्वे गाडय़ांच्या १० हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही
2 Budget 2019 : मुंबईच्या जीवनवाहिनीला ५७८ कोटींचा निधी
3 budget 2019 : जोगेश्वरीत नवीन टर्मिनस लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणार
Just Now!
X