News Flash

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन सेवेसाठी एकच हेल्पलाइन

आता संपूर्ण राज्यासाठी एकच क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जुन्या देणींसाठी नवे कर्ज

राज्य सरकारचा निर्णय; ११२ क्रमांकावर सुविधा

आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन सेवेसाठी असलेल्या वेगवेगळ्या क्रमांकांच्या हेल्पलाइन्सऐवजी आता संपूर्ण राज्यासाठी  एकच क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार ११२ क्रमांकावर तिन्ही सेवा उपलब्ध होणार असून त्यासाठी मेसर्स ई अ‍ॅन्ड वाय या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

राज्यात सध्या आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांच्या मदतीसाठी १००, तर अग्निशमन सेवेसाठी १०१, तर रुग्णवाहिकेसाठी १०२ असे हेल्पलाइन क्रमांक आहेत. याशिवाय शहरनिहाय महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, नैसर्गिक आपत्ती अशा महत्त्वाच्या घटनांसाठी वेगवेगळ्या क्रमांकांच्या हेल्पलाइन्स आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नेमका कोणता क्रमांक डायल करायचा याबाबत लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. त्यामुळे केवळ एकाच क्रमांकावर या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यानुसार राज्यात ११२ या क्रमांकाची एकच हेल्पलाइन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून लोकांना राज्याच्या कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत मिळू शकेल. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागास दिले आहेत. त्यानुसार या विभागाने मेसर्स ई अ‍ॅन्ड वाय या कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून येत्या सहा महिन्यांत ही हेल्पलाइन सुरू होणार असल्याची माहिती गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. केंद्र सरकारही देशपातळीवर लवकरच नवीन ११२ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करणार असून त्यापूर्वी राज्यात ही सुविधा निर्माण होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:07 am

Web Title: 112 new helpline no for police ambulance fire in maharashtra state
Next Stories
1 शहरबात : थोडी खुशी, थोडा गम..
2 शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे पाकचे राजकारणच!
3 तपासचक्र : पैसे गेले अन् भवितव्यही!
Just Now!
X