News Flash

निलंबनाविरोधात १२ भाजप आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कारवाई करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार सुनावणी घेऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही.

मुंबई : विधानसभेतून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या बारा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी चार याचिका सादर केल्या आहेत. नैसर्गिक न्यायतत्त्वांचे उल्लंघन करून राजकीय उद्देशाने निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबनाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

भाजपचे मुख्य प्रतोद आशीष शेलार, आमदार गिरीश महाजन, योगेश सागर, अतुल भातखळकर, डॉ. संजय कुटे अभिमन्यू पवार, अँड. पराग अळवणी आदी बारा आमदारांना सभागृहात आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी दालनात गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव पाच जुलै रोजी एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ झाला, काही भाजप सदस्य अध्यक्षांपुढील व्यासपीठावर गेले. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याबरोबर दालनात अयोग्य वर्तन झाले, तेथे आमदारांमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की झाली. हा ठपकाही या आमदारांवर आहे.

या आरोपांमध्ये तथ्य नाही. यासंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत. कारवाई करण्यापूर्वी नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार सुनावणी घेऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. अध्यक्षांच्या दालनातील  प्रकाराचेही ध्वनिचित्रमुद्रण उपलब्ध नसून सत्ताधारी आमदारांनीच शिवीगाळ केली, बारापैकी काही आमदार दालनात हजरही नसताना त्यांच्यावर कारवाई झाली आहे, असे याचिकांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहातील प्रसंग, व्यासपीठावर चढलेले सदस्य, सभागृहात खाली असलेले सदस्य, अध्यक्षांच्या दालनात हजर नसलेले सदस्य अशा वर्गवारीनुसार आमदारांच्या चार याचिका सादर करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:04 am

Web Title: 12 bjp mla against suspension supreme court akp 94
Next Stories
1 भाजपचे २ ऑगस्टपासून ‘सविनय नियमभंग’
2 लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबत राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
3 राज कुंद्राच्या आदेशावरून बनविलेले ७० अश्लील व्हिडिओ मुंबई पोलिसांनी केले जप्त