News Flash

राज्यातील १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची बदली गृहविभागात करण्यात आली आहे.

( संग्रहीत छायाचित्र )

सुधीरकुमार श्रीवास्तव ‘एमपीसीबी’च्या अध्यक्षपदी;शिक्षण विभागात वंदना कृष्णा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परदेश दौरा आणि प्रशासनातील फेरबदल हे समीकरण मुख्यमंत्र्यांच्या या परदेश दौऱ्यातही कायम राहिले असून सोमवारी राज्य सरकारने १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. शिक्षण विभागाचे वादग्रस्त प्रधान सचिव नंदकुमार यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर वित्त विभागाच्या (सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची नियुक्ती शिक्षण विभागात करण्यात आली आहे. तर गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.

राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची बदली गृहविभागात करण्यात आली आहे. तर पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांची बदली उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची बदली पर्यावरण विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची वित्त विभागात (सुधारणा) प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. परिवहन आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशीषकुमार सिंग यांची बदली परिवहन आणि बंदरे विभागात करण्यात आली आहे. ठाणे आदिवासी विभागाचे अपर आयुक्त मनोज सूर्यवंशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर केली आहे. तर संजय मीना यांची आदिवासी विकास महामंडळाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 3:37 am

Web Title: 12 ias officer transfers maharashtra government
Next Stories
1 चार महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर
2 विश्वास पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न?
3 तारपोरवाला मत्स्यालयातील कासवांचा आकस्मिक मृत्यू
Just Now!
X