नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईच्या चौपाट्यांसह गेट वे, मरिन लाईन्सवर आंनदोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत.  प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत चार आणि विरार ते चर्चगेटपर्यंत चार विशेष लोकल चालविण्यात येतील. तर मध्य रेल्वेही चार विशेष लोकल चालविणार आहे.

अशा धावतील विशेष लोकल –
मध्य-हार्बर मार्गावर ३१ डिसेंबरच्या रात्री चार विशेष लोकल –
पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आणि कल्याण स्थानकात रात्री ३ वाजता पोहोचणार
दुसरी लोकल कल्याण स्थानकातून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटून सीएसएमटी येथे रात्री ३ वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावरील पहिली विशेष लोकल सीएसएमटीहून१ वाजून ३० मिनिटांनी सुटून पनवेलला २.३० वाजता पोहोचेल.
तर, दुसरी लोकल पनवेल स्थानकातून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटून सीएसएमटी येथे २ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.

पश्चिम मार्ग –
चर्चगेट येथून विरारसाठी रात्री १ वाजून १५ मिनिटांनी
दुसरी लोकल चर्चगेट येथून विरारसाठी रात्री २ वाजता
तिसरी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री २ वाजून ३० मिनिटांनी
तर, चौथी लोकल चर्चगेट स्थानकातून रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी
अप मार्गावरील विशेष लोकलमध्ये पहिली लोकल विरार स्थानकातून रात्री १२ वाजता
दुसरी लोकल विरार स्थानकातून रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी
तिसरी लोकल विरार स्थानकातून रात्री १ वाजून ४० मिनिटांनी
तर, चौथी लोकल विरार स्थानकातून रात्री ३ वाजून ०५ मिनिटांनी असून चर्चगेट स्थानकात पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी पोहोचेल.