गोवंडीत १२ वर्षाच्या मुलाने खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षिकेचा आईसोबत वाद झाल्याने मुलाने धारदार शस्त्राने वार करत शिक्षिकेची हत्या केली. सोमवारी संध्याकाळी शिवाजीनगर परिसरात हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयेश असलम असं पीडित शिक्षिकेचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा मुलाला आपल्या घरात शिकवणी देत होत्या. सोमवारी मुलाची आई शिक्षिकेच्या घरी आली होती. यावेळी त्यांनी घरातील काही सामान खरेदी करण्यासाठी उसणे पैसे मागितले. मात्र शिक्षिकेने नकार दिला. यावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला. यावेळी मुलगा तिथेच उपस्थित होता. मुलाने तिथेच खाली पडलेला चाकू उचलला आणि शिक्षेकेवर वार केले.

जखमी अवस्थेत आयेशा यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं.  पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास  करत आहेत.