04 July 2020

News Flash

राज्यात १२० जणांचा मृत्यू

मुंबईतील ५४, तर पुणे व ठाणे येथे प्रत्येकी दहा जणांचा समावेश आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात शनिवारी करोनाच्या २,७३९ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८ झाली आहे. दिवसभरात १२० रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईतील ५४, तर पुणे व ठाणे येथे प्रत्येकी दहा जणांचा समावेश आहे. राज्यात एकूण २,९६९ मृत्यू  झाले असून त्यापैकी १,५७७ मुंबईत नोंदविण्यात आले.

राज्यात शनिवारी २,२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. शनिवारी कोरोनाच्या २,७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 12:40 am

Web Title: 120 died in state due to corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 आधी वाहतुकीची व्यवस्था करा
2 उद्यापासून ‘बेस्ट’ सेवा
3 ‘रेमडेसिवीर’ उत्पादनाच्या मंजुरीसाठी भारतीय कंपन्या प्रतीक्षेत
Just Now!
X