मुंबईतील विशेष मुलांच्या शाळांमधील १२०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तीन महिने पगारापासून वंचित आहेत. ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे या शिक्षकांचे पगार जमा होऊ शकले नाही असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
विशेष मुलांच्या शाळा या सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येतात. राज्य शासनाच्या विविध विभागांचे पगार हे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे काढले जातात. या प्रक्रियेतील काही तांत्रिक अडचणींमुळे या शिक्षकांचा पगार तीन महिने होऊ शकलेला नाही. तांत्रिक अडचणींमुळे पगार थांबविणे हे अन्यायकारक आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पगार होत नसतील तर ते ऑफलाइन प्रक्रिया पार पाडून जमा करावेत अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह जालिंदर सरोद व सुभाष मोरे यांच्या शिष्ट मंडळाने सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक उपायुक्तांची भेट घेतली.