27 November 2020

News Flash

मुंबईत १,२३३ नवे रुग्ण

४५ रुग्णांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सोमवारी १२३३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर एकाच दिवसात २०९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर हळूहळू पुन्हा एकदा कमी होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीड ते दोन हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होत असताना सोमवारी १२३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २,४३,१७२ झाली आहे.

आतापर्यंतच्या मृतांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्वचा भाग असलेल्या के पूर्व प्रभागात सर्वाधिक म्हणजेच ६५७ मृत्यू झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:21 am

Web Title: 1233 new patients in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल
2 विजेचा धक्क्य़ाने दोन कामगारांचा मृत्यू
3 टाटाचे वीजसंच बंद पडल्याने मुंबईतील वीजसंकट चिघळले
Just Now!
X