24 September 2020

News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आतापर्यंत १५.८२ कोटी रुपयांचा खर्च

१३ विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त

१३ विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त

बहुप्रतीक्षेनंतर मुंबईलगत अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी १३ विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ महिन्यांपूर्वी या स्मारकाचे जलपूजन केल्यापासून आतापर्यंत यावर १५ कोटी ८२ लाख ८० हजार ११ रुपये इतका खर्च झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकत्रे अनिल गलगली यांच्या माहिती अर्जावर एमएमआरडीए आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प विभागाने माहिती उपलब्ध करून दिली आहे. प्रकल्प विभागाचे उपअभियंता विजय जेथ्रा यांनी गलगली यांना उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रात १३ विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि त्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती आहे. ज्या १३ विभागांनी ना-हरकत प्रमाणपत्रे दिली आहेत त्यात नेव्ही, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरिटाइम बोर्ड, बीएनएचएस, मत्स्य व्यवसाय विभाग, कोस्ट गार्ड पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, वन आणि पर्यावरण विभाग, राष्ट्रीय सुरक्षारक्षक, मुंबई महानगरपालिका आयुक्त, बेस्ट महासंचालक, विमानतळ प्राधिकरण, एव्हिएशन ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

या प्रकल्पासाठी आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने ईजीआयएस इंडिया कन्स्ट्रक्शन या कंपनीस १० कोटी १८ लाख १० हजार १७७ रुपये इतकी रक्कम दिली. तसेच देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीस दहा लाख ६९ हजार ८३४ कोटी रुपये तर इतर बाबींसाठी पाच कोटी ५४ लाख इतका खर्च केला आहे.

तज्ज्ञ समितीची स्थापना

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देताना दिलेल्या अभिप्रायानंतर शासनाने एक तज्ज्ञ समितीची स्थापना केली ज्यात सर्व विभागांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अभिप्रायात दहशतवादी कृत्याची शक्यता व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याविरोधी उपाययोजनांबाबत सूतोवाच केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2017 12:29 am

Web Title: 13 departments get non objection certificate to chhatrapati shivaji maharaj memorial
Next Stories
1 २६/११ सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली- मुख्यमंत्री
2 मानखुर्दमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू
3 एका दिवसात ९६९ विमानांचं टेक ऑफ, लँडिंग; मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम
Just Now!
X