मुंबईतल्या कफ परेड भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या तीन नराधमांनीच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. १० जून रोजी ही घटना घडली जी आज उघडकीस आली. हे तिघेही नराधम फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
Maharashtra: 13-year-old girl gang-raped in Cuffe Parade, Mumbai allegedly by 3 of her neighbors on 10th June. Case registered under relevant sections of the IPC and POCSO act. Accused absconding.
— ANI (@ANI) June 14, 2019
११ जून रोजी नागपुरातही चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. २८ वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता या प्रकरणाला तीन दिवस उलटत नाहीत तोच मुंबईतही १० जून रोजी १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. १३ वर्षांच्या मुलीवर तिच्या शेजारी रहाणाऱ्या नराधमांनीच बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कफ परेड या ठिकाणी ही घटना घडली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 14, 2019 10:31 am