26 November 2020

News Flash

मुंबईत १४ लाख चाचण्यांचा टप्पा पार

दिवसभरात १४६३ रुग्ण; ४९ जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील करोना चाचण्यांनी १४ लाखांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी १५६०० चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १४६३ रुग्णांना करोना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. तर गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांचा मृत्यू झाला.

दर दिवशी १८ ते २० चाचण्या करण्याचे लक्ष्य पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. हे लक्ष्य गाठता आलेले नसले तरी चाचण्यांची संख्या वाढली आहे. दर दिवशी १० ते १५ हजार चाचण्या होत आहेत. ऑक्टोबर महिन्यात गेल्या वीस दिवसांत २ लाख ९१ हजार चाचण्या करण्यात आल्या.

गुरुवारी १४६३ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या २,४७,३३४ झाली आहे. तर एका दिवसात १२८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत २,१६,५५८ म्हणजेच ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. १९,४९१ रुग्ण उपचाराधीन असून, रुग्णवाढीचा दर ०.६४ टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १०८ दिवसांवर गेला आहे.

गुरुवारी ४९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ९९१८ वर गेला आहे. ४९ मृतांपैकी ३९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर ३५ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. मुंबईतील मृत्यूचा दर ४ टक्क्यांपर्यंत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ८५९ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी ८५९ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ४ हजार ५१३ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात २३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण बळींची संख्या ५ हजार १८१ वर पोहोचली आहे.

देशाची रुग्णसंख्या ७७ लाखांवर

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ५५,८३९ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७७,०६,९४६ वर पोहोचली आहे. त्यातील ६८,७४,५१८ रुग्ण बरे झाले असून, करोनामुक्तांचे प्रमाण ८९.२० टक्के आहे.  करोनाबळींच्या रोजच्या संख्येतही उत्तरोत्तर घट नोंदविण्यात येत आहे. दिवसभरात करोनामुळे ७०२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या १,१६,६१६ वर पोहोचली. मृतांचे हे प्रमाण १.५१ टक्के आहे. देशभरात ७,१५,८१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण ९.२९ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:22 am

Web Title: 14 lakh tests crossed in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्रवेश होईपर्यंत अकरावीसाठी ऑनलाइन अभ्यास
2 पोलिसांची खाती एचडीएफसी बँकेत
3 ‘रेमडेसिवीर’ करोना उपचारात उपयुक्त
Just Now!
X