05 June 2020

News Flash

coronavirus  : १४ हजार करोना संशयितांच्या तपासण्या

विलगीकरणासाठी ११ हजार ३०० खोल्या ताब्यात

विलगीकरणासाठी ११ हजार ३०० खोल्या ताब्यात

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई महापालिका रुग्णालयातील पाच आणि आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये तब्बल १४ हजार करोना संशयितांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसांमध्ये यापैकी तब्बल नऊ हजार वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे बाधितांना अलगीकरणात ठेवण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. त्याचबरोबर संशयितांना विलगीकरणात ठेवण्यासाठी हॉटेल, धर्मशाळांमधील सुमारे ११ हजार ३०० खोल्या पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असून करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. करोनाबाधित रुग्णाची वैद्यकीय तपासणी, चाचणी आणि उपचाराची सुविधा केवळ पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपलब्ध होती. मात्र करोनाबाधित आणि संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत करोनाविषयक वैद्यकीय तपासणीची सुविधा पालिकेच्या पाच प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर आठ खासगी प्रयोगशाळांमध्येही करोनाविषयक वैद्यकीय चाचणीची सुविधा सुरू करण्यात आली.

आजघडीला पालिका आणि खासगी अशा मिळून १३ प्रयोगशाळांमध्ये या तपासण्या करण्यात येत आहेत. पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन करोनाची लक्षणे आढळणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

लक्षणे आढळताच संबंधित व्यक्तीची करोनाविषयक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल १४ हजार करोना संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यापैकी नऊ हजार संशयितांची गेल्या सात दिवसांत तपासणी करण्यात आली आहे हे विशेष. अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्यामुळे करोनाबाधित रुग्ण निदर्शनास येत असून त्यांना विलगीकरणात ठेवण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळत आहे.

विलगीकरणासाठी पालिकेने हॉटेल, धर्मशाळा, लॉज आदींमधील तब्बल ११ हजार ३०० खोल्या ताब्यात घेतला आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना विलगीकरणात ठेवण्यासाठी या खोल्यांचा वापर करण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत सर्वाधिक  

अन्य राज्यांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याखालोखाल केरळ (११ हजार २३२ जणांच्या चाचण्या), दिल्ली (आठ हजार ४६४), कर्नाटक (सहा हजार ५८०) आणि तमिळनाडू (पाच हजार ३०५) यांचा क्रमांक लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 2:49 am

Web Title: 14 thousand coronavirus suspects test in mumbai zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus outbreak : बेस्ट प्रवासात सामाजिक अंतराचे तीनतेरा
2 Coronavirus : अत्यावश्यक सेवेकरींचा संकटांशी सामना
3 उच्च न्यायालयाच्या दूरचित्रसंवाद सुनावणीत आता सर्वसामान्यांनाही सहभागी होण्याची सुविधा
Just Now!
X