20 November 2019

News Flash

‘बेस्ट’च्या पासधारकांत १४ हजारांची भर

प्रवासी व उत्पन्नवाढीसाठी बेस्ट प्रशासनाने ९ जुलैपासून भाडेकपात लागू केली.

(संग्रहित छायाचित्र)

बेस्टचा स्वस्त बेस्टच्या स्वस्त प्रवासावर विश्वास दाखवत दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांबरोबरच पासधारकांनीही बेस्ट प्रवासाला पसंती दिली आहे. चार दिवसांत बेस्ट प्रवाशांच्या संख्येत सात लाखांनी वाढ झाली असतानाच त्यात १४ हजारांनी पासधारकही वाढले आहेत.

प्रवासी व उत्पन्नवाढीसाठी बेस्ट प्रशासनाने ९ जुलैपासून भाडेकपात लागू केली. त्यामुळे बेस्टचे साध्या बसला पाच किलोमीटरसाठी किमान भाडे पाच, तर वातानुकूलितचेही भाडे सहा रुपये झाले. तिकिटांबरोबरच महिन्याचा व तीन महिन्यांच्या पासांच्या दरातही कपात करण्यात आली. पूर्वी २ किलोमीटर, चार किलोमीटर याप्रमाणे पुढील टप्पे येत होते.  चार किलोमीटपर्यंत बसचा पास हा ४०० रुपयांपेक्षा जास्त होत होता. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत होती. तरीही ३ लाख १५ हजार पासधारक होते.  बेस्टने तिकीट दरांबरोबरच पासदरांतही भाडेकपात केल्याने अंतरावरील बस पास व विद्यार्थी पासाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. नवीन बसपास दरांसाठीही पाच किलोमीटर, १० किमी, १५ किमीपेक्षा अधिक किलोमीटर असे टप्पे ठेवले. अंतर जास्त व पासांतील दरकपातही चांगली असल्याने त्यात ९ ते १२ जुलैपर्यंत १४ हजारांनी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्थानकातून बाहेर पडताच ‘बेस्ट’

रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारा प्रवासी रिक्षा-टॅक्सीकडे न वळता बेस्ट बसकडे यावा यासाठी उपक्रमाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मेगाफोन किंवा मोठमोठ्याने ओरडून प्रवाशांना स्वस्त प्रवासाची माहिती दिली जात आहे. बेस्टमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानक ते घर, कार्यालय व अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशाला तात्काळ एखादी वाहतुक सेवा हवी असते. त्यामुळे गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता अधिकाधिक बससेवा देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच सीएसएमटी, भांडुप, घाटकोपर, कुर्ला यासह मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या बेस्टला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

७,२०,७४३

९ जुलैपासून बेस्टच्या प्रवासी संख्येतील वाढ

५४,७७,६११

रुपयांची उत्पन्नात घट (९ जुलैपासून)

२४,३६,१८३

तिकिटांची विक्री (११ जुलै रोजी)

First Published on July 13, 2019 1:37 am

Web Title: 14 thousand people of best pass holders abn 97
Just Now!
X