नवी मुंबई-नवी  मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या ४५ हजारांवर गेली आहे. शहरात आजपर्यंत एकूण ९१८  रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. शहरात आत्तापर्यं एकूण ४५२८८ करोनाबधित झाले आहेत. आज शहरात १४५ नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

नवी मुंबईत करोनाच्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची आत्तपर्यंतची एकूण संख्या ४५ हजार २८८ झाली आहे. तर शहरात आज तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९१८ झाली आहे. शहरात आतापर्यंत एकूण २ लाख ९६ हजार २३४ जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या आहेत. करोनामुक्तीचा दर  वाढला आहे. तर शहरातील मृत्यू दरही कमी  आहे. आज शहरात १५८ जन करोनामुक्त झाले असून आतापर्यंत  एकूण ४२,८५५ जन करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात १५१५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.