04 August 2020

News Flash

१५ डब्यांची लोकल आजपासून

मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे नवे वेळापत्रक सोमवारपासून लागू होत असले तरी त्यात अंतर्भूत असलेली १५ डब्यांची गाडी मंगळवारपासून सुरू होत आहे.

| October 16, 2012 08:24 am

मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांचे नवे वेळापत्रक सोमवारपासून लागू होत असले तरी त्यात अंतर्भूत असलेली १५ डब्यांची गाडी मंगळवारपासून सुरू होत आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नवी गाडी सुरू करायला नको, या अंधश्रद्धेपोटी ही गाडी मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर १५ डब्यांची गाडी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या पाश्र्वभूमीवर ‘काही तांत्रिक अडचणीं’मुळे १५ डब्यांची गाडी सोमवारऐवजी मंगळवारपासून सुरू होत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सोमवारी सर्वपित्री अमावस्या असल्याने नवी गाडी त्या दिवशी सुरू करू नये, असा आग्रह अधिकाऱ्यांनीच महाव्यवस्थापकांकडे धरला होता. त्याचप्रमाणे या गाडीचे डबे अधिक असल्याने गाडीला अतिरिक्त मोटरमन आणि गार्ड असावा अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली होती.
नव्या तीन डब्यांमध्ये महिलांसाठी एक, प्रथम वर्गासाठी एक आणि दुसऱ्या वर्गाचा साधारण डबा यांचा समावेश होता. त्यामुळे तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ७.३३ वाजता ही गाडी कल्याणसाठी आपला प्रवास सुरू करेल, असे स्पष्ट केले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2012 8:24 am

Web Title: 15 coaches local train from today
Next Stories
1 मुंबईतील उन्नत रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांसाठी अधिकाऱ्यांचा उच्चस्तरीय गट स्थापणार
2 ‘कोमसाप’च्या संमेलनाध्यक्षपदी अशोक नायगावकर
3 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ४१ फ्लॅटची भेट?
Just Now!
X