राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून मुंबई शहरातही मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा एक भाग म्हणून रविवारी या बदल्या करण्यात आल्या. मुंबईतल्या १५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ३ साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मुंबईत अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवे पोलीस निरीक्षक
*अजित सुर्वे (मालाड) ’राजेंद्र चव्हाण (जुहू) ’ अरुण भगत (एमआयडीसी) ’शंकरसिंह राजपूत (ना. म. जोशी मार्ग) ’सुरेश हुजबंड (डी. बी. मार्ग) ’विनय बगाडे (चुनाभट्टी) ’अशोक कळमकर (एमएचबी) ’सुरेश किलजे (व्ही. पी. रोड) ’सुनील जैन (वरळी) ’विजय कदम (ट्रॉम्बे) ’सुहास गरुड (वडाळा ट्रक टर्मिनस) ’प्रशांत मर्दे (भांडुप) ’ज्ञानेश्वर जवळकर (बांगूर नगर) *अविनाश जाधव (ताडदेव) ’वलास कानडे (मानखुर्द)
नवे साहाय्यक पोलीस आयुक्त
*सुनील देशमुख (माहीम) ’विजय बागवे (दहिसर) ’अनंत जाधव (देवनार)