News Flash

२१ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १५ वर्षाचा मुलगा अटकेत

२१ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका १५ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या बहाण्याने या मुलाने बलात्कार केला असा आरोप या मुलीने केला आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र

२१ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका १५ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. लग्नाच्या बहाण्याने या मुलाने बलात्कार केला असा आरोप या मुलीने केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने तिचा जबाब नोंदवला आहे. या मुलीने केलेल्या आरोपानंतर तिची वैद्यकीत तपासणीही करण्यात आली. ज्यानंतर या मुलीवर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या मुलाने आम्ही दोघंही घरातून पळून गेलो होतो असं म्हटलं आहे.  या प्रकरणातला मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईतील एका हॉटेलमध्ये या मुलाने मला डांबले होते आणि माझे लैंगिक शोषण केले तसंच माझ्यावर बलात्कार केला असं पीडित मुलीने सांगितलं आहे. याबाबत अधिक तपास केला असता हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि पंधरा दिवसांपूर्वी पळून गेले होते अशी माहिती समोर आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर प्रकरण आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे मांडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आम्ही मुलीच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. या मुलाची रवानगी तोपर्यंत बालसुधारगृहात करण्यात आली आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 10:54 am

Web Title: 15 year old apprehended for raping woman scj 81
Next Stories
1 ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते : संजय राऊत
2 मुंबईतील भेंडी बाजार भागात इमारतीला भीषण आग
3 ओला दुष्काळ जाहीर करा!
Just Now!
X