News Flash

इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट पोस्ट करून केली आत्महत्या

मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आई मुलाला ओरडत असे याच कारणामुळे मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मंगळवारी पहाटे सकाळी कांदिवली पूर्व येथे राहणऱ्या एका पंधरा वर्षीय १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे या मुलाने इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट पोस्ट करून ही आत्महत्या केली आहे. मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आई मुलाला ओरडत असे याच कारणामुळे मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मुलाच्या आईवडिलांचा पर्यटन व्यवसाय आहे. त्याकारणांमुळेच आईवडिल हे नेहमी घराबाहेर असत. मुलगा आणि त्याची मोठी बहीण आपल्या आजोबांसोबत जास्त वेळ घालवत असत. हा मुलगा अभ्यासातसुद्धा चांगला होता, नुकतीच त्याने नववीची परीक्षा दिली.

मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास, या मुलाला १४ व्या मजल्यावरुन उडी मारताना समोरच्या इमारतीतील एका महिलेने पाहिले. महिलेने ताबडतोब सदर प्रकाराची मीहिती सुरक्षा रक्षकाला फोन करुन दिल्याचे तिने सांगितले. सुरक्षा रक्षकाने  या घटनेची माहीती आपल्या पर्यवेक्षकास दिली परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 8:00 pm

Web Title: 15 year old commited suicide after posting suicide note on instagram
Next Stories
1 कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफेच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
2 सत्ता आहे म्हणून दुरुपयोग करु नका, राज ठाकरेंनी भाजपाला सुनावलं
3 कर्नाटकात भाजपाचा विजय ही मोदींची नव्हे, तर कानडी जनतेची लाट : शिवसेना
Just Now!
X