28 September 2020

News Flash

मुंबईतील वैज्ञानिकाचा अल्पवयीन मुलगा बेपत्ता; नैराश्याने ग्रासल्याने सोडले घर

२३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथील आपल्या घरातून निघून गेला. पोलीस त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मुंबई येथील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील (बार्क) एका वैज्ञानिकाचा अल्पवयीन मुलगा गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता आहे.

मुंबई येथील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील (बार्क) एका वैज्ञानिकाचा अल्पवयीन मुलगा गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता आहे. अभ्यासाचा ताण आणि नैराश्याने ग्रासल्याने तो घरातून निघून गेला असावा असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, अजूनही त्याचा तपास लागला नसल्याने त्याचे आई वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे.


नमन दत्त (वय १७) असे या बेपत्ता झालेल्या वैज्ञानिकाच्या मुलाचे नाव आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तो वाशी येथील आपल्या घरातून निघून गेला. पोलीस त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच्या कॉल रेकॉर्डसह तो कुठे गेला असेल याची शक्यता तपासत त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यानंतर तो अद्याप घरी परतलाच नसल्याचे नमनची आई चंद्रा राममुर्ती यांनी सांगितले.

घरातील एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला मानसिक धक्का बसला होता. त्याचबरोबर अभ्यासाचाही त्याच्यावर ताण होता. यामुळे नैराश्यात गेलेल्या नमनवर काही दिवसांपासून उपचारही सुरु होते. उपचारांमुळे तो नैराश्यातून बाहेरही येत होता, अशी माहितीही त्याच्या आईने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 10:39 am

Web Title: 17 years old son of a bhabha atomic research centre scientist has been missing from sept 23
Next Stories
1 मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे मैदानात, गांधी जयंतीपासून करणार आंदोलन
2 पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले; नागरिकांसाठी महागाईची झळ कायम
3 कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटके सापडल्याने खळबळ
Just Now!
X