मुंबई : म्हाडाच्या घरांसाठी सोमवार संध्याकाळपर्यंत पावणेदोन लाख अर्ज आले असून त्यांची सोडत रविवारी काढण्यात येणार आहे. म्हाडाने सायन, वडाळा, ग्रँट रोड, चेंबूर, घाटकोपर, कांदिवली पश्चिम, गोरेगाव पूर्व आणि पश्चिम, मालाड, बोरिवली, दहिसर, माटुंगा, दादर, अँटॉप हिल, विक्रोळी पूर्व मानखुर्द, पवई आणि मुलुंड येथील एक हजार ३८४ घरांसाठी सोडत जाहीर केली होती.

या घरांसाठी सोमवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत एक लाख ९० हजार ५०१ अर्ज आल्याची माहिती म्हाडाच्या सूत्रांनी दिली. त्यात अनामत रक्कम न भरलेल्या अर्जदारांची संख्या ३६ हजार १२५ आणि अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांची संख्या एक लाख ५४ हजार ३७६ आहे. सोमवारी रात्री १२ ला अर्ज करण्याची मुदत संपली.

रविवारी सोडत

* स्वीकृत अर्जाची यादी शुक्रवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ला प्रसिद्ध करण्यात येईल तर रविवारी १६ डिसेंबरला वांद्रे येथील गृहनिर्माण भवनात आणि म्हाडाच्या वेबसाइटवर सकाळी १० ला सोडतीतील भाग्यवंतांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

* सोडतप्रक्रिया आणि  पूर्व तयारीचे थेट प्रक्षेपण  https://lottery.mhada.gov.in/  या संकेतस्थळावर सकाळी ७ वाजल्यापासून होणार आहे.