मुंबईत आत्तापर्यंत १८७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. आत्तापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर २१ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्याही ८२ जणांना करोनाची बाधा झाली आहे अशीही माहिती समोर आली आहे. या पोलिसांना मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं.
1871 Mumbai police personnel have been infected with #COVID19 so far, including 853 recovered & 21 deaths. 82 positive cases also reported among State Reserve Police Force (SRPF) personnel deployed in the city: Mumbai Police #Maharashtra pic.twitter.com/WMhaVPkzIA
— ANI (@ANI) June 9, 2020
८ जूनपर्यंत आलेल्या अहवालातील माहिती
कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ५७१ जण आहेत. २३१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. होम आयसोलेशनमध्ये ३१ जणांना ठेवण्यात आलं आहे. १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६३४ जण बरे झाले आहेत, मात्र त्यांनी अजून ड्युटी जॉईन केलेली नाही. जे बरे झाले आहेत आणि ड्युटी जॉईन केली असे २१९ जण आहेत. तर २१ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 4:24 pm