News Flash

कल्याणमध्ये १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला

१९ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा मृत अवस्थेत आढल्याची घटना शुक्रवारी घडली.

| February 22, 2014 01:57 am

कल्याणमध्ये १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला

१९ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचा मृत अवस्थेत आढल्याची घटना शुक्रवारी घडली. या तरुणीच्या गळ्यावर वार केल्याच्या जखमा आढल्या असून, तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मृत तरूणीचे नाव रजनी रामकुमार वर्मा असे आहे. तिचा मृतदेह कल्याण आणि डोबिंवली दरम्यान असलेल्या नांदिवली भागात आढळला. मृतदेहाजवळ सापडलेल्या ओळपत्राच्याआधारे तिची ओळख पटविण्यात आली आहे. कोचिंग क्लासला जाण्यासाठी गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान रजनी घरातून  बाहेर पडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर त्यांनी स्थानिक पोलिसांकडे ती गायब झाल्याची तक्रार नोंदवली.
रजनीच्या खून हा प्रेमप्रकरणामुळे झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, खरे कारण अद्याप कळू शकलेले नाही. शवविच्छेदनासाठी रजनीचे मृत शरिर पाठविण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तिंविरुद्ध खूनाची नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2014 1:57 am

Web Title: 19 year old girls body found police suspect jilted lover
टॅग : Crime News,Kalyan
Next Stories
1 मुंबईत येणाऱ्या गाडय़ांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा का नाही?
2 कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा उमेदवारासाठी शोधाशोध
3 मोदी छाप तिळगूळ, प्रेमदिनाचे रक्तदान..
Just Now!
X