News Flash

मढ आयलंड येथे बोट बुडाल्याने दोघांचा मृत्यू, चौघांची सुटका

शोध मोहीम आता थांबवण्यात आली आहे

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील मढ आयलंड येथे हरबोट बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांची सुटका करण्यात आली आहे. एक जण बेपत्ता आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ही घटना १५ एप्रिलला म्हणजेच काल घडली आहे. या बोटीमध्ये सात जण होते. चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर समुद्रात बुडालेल्या चौघांना वाचवण्यात यश आले. शोध मोहीम आता थांबवण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने वर्सोवा ते मढ या कमी अंतर असलेल्या दोन किनाऱ्यांलागत चालणारी सागरी वाहतूकही बंद आहे. त्यामुळे आकाराने लहान असलेली खासगी बोट घेऊन काही कामगार सुके मासे गोदामात ठेवण्याच्या निमित्ताने मढ येथे गेले. माल गोदामात ठेऊन वर्सोव्याच्या दिशेने परतत असताना या बोटीचा तोल जाऊन बोट उलटली. वाऱ्याचा वेग आणि क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने बोट उलटल्याचे स्थानिक  पोलिसांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 6:58 pm

Web Title: 2 people dead 1 missing and 4 rescued after a boat capsized in the sea at madh jetti malad mumbai scj 81
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत दिवसभरात तिघांचा मृत्यू, आढळले 107 नवे रुग्ण
2 सुरतमधील परप्रातींयांच्या घटनेचा साधा उल्लेखही नाही, हे मोठे षड्यंत्र आहे – शिवसेना
3 ‘ती’ गर्दी शास्त्रीनगरची!
Just Now!
X