राज्याच्या वीजनिर्मिती क्षमतेत २०१३-१४ मध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली, औष्णिक वीजनिर्मिती क्षमता १३ हजार ९४६ मेगावॉटवरून १७ हजार २०६ मेगावॉट म्हणजेच २३ टक्क्यांनी वाढली. मात्र प्रत्यक्ष वीजनिर्मितीत केवळ ४.४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे वीजप्रकल्पांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विजेचा वापर १ लाख २ हजार ९८९ दशलक्ष युनिट्स इतका होता. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी जास्त होता. विजेच्या तुटीचे प्रमाणही नियंत्रणात आले असून कमाल मागणी १४ हजार ४०६ मेगावॉट नोंदवली जात असताना १३ हजार ८३० मेगावॉट वीज पुरवण्यात आली. तुटीचे प्रमाण ५७६ मेगावॉट इतके अल्प होते