पावसाच्या अनियमिततेमुळे तलावांतील साठय़ात गतवर्षांच्या तुलनेत सरासरी २८ टक्के पाणी कमी असल्याने मुंबईसमोर पाणीसंकट उभे ठाकले आहे. मुंबई महापालिकेने बुधवारी मध्यरात्रीपासून शहरात २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्याचबरोबर तरण तलाव, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, बाटलीबंद पाण्याचे कारखाने, रेसकोर्स आदींच्या पाणीपुरवठय़ात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. पावसाची अनियमितता कायम राहिल्यास भविष्यात पाणीकपातीत वाढ होण्याची शक्यता आहे.
mum02१०० मि.मी.पेक्षा अधिक आकाराच्या जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठय़ातही ५० टक्के कपात करण्यात आली आहे. ठाणे तसेच भिवंडी येथील महापालिका आणि नगरपालिकांना मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ातही २० टक्के कपात करण्यात आली आहे.
जूनमध्ये दडी मारणाऱ्या पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आणि मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा तलावांमधील पाणीसाठय़ात लक्षणीय भर पडली. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर तलावांमधील जलसाठा घटला.  बुधवारी सकाळी ६ वाजता तलावांमध्ये ९,६२,३३८ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये २८ टक्के अधिक म्हणजे १३,३६,२५८ दशलक्ष इतके पाणी होते.
भातसा तलावात १७४ दिवस, तर वैतरणामध्ये २२२ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आतापासूनच मुंबईकरांच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी ही कपात करण्यात आली असून १ ऑक्टोबर रोजी उपलब्ध साठय़ाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
चर्चेविना प्रस्ताव मंजूर
प्रशासनाने पाणीकपातीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केला होता. या विषयावर चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षाचे नगरसेवक करीत असतानाच स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन टाकली. चर्चेविना प्रस्ताव मंजूर केल्यामुळे केवळ विरोधी पक्षाचेच नव्हे तर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे नगरसेवकही नाराज झाले.
पाणीसाठय़ात लक्षणीय भर पडली. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर तलावांमधील जलसाठा घटला.  बुधवारी सकाळी ६ वाजता तलावांमध्ये ९,६२,३३८ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावांमध्ये २८ टक्के अधिक म्हणजे १३,३६,२५८ दशलक्ष इतके पाणी होते.  भातसा तलावात १७४ दिवस, तर वैतरणामध्ये २२२ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आतापासूनच मुंबईकरांच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी ही कपात करण्यात आली असून १ ऑक्टोबर रोजी उपलब्ध साठय़ाची स्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

..तर कपात मागे
दररोज तलाव स्थिती आणि पावसाचा आढावा घेण्यात येणार असून मुबलक पाऊस पडल्यास पाणीकपात मागे घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले.