News Flash

लोकलमधील गर्दीमुळे तोल गेल्याने डोंबिवलीतील तरूणाचा मृत्यू

या अपघातामुळे ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

मुंबईत रेल्वे अपघातात बळी पडणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याच घटनेला भावेश नकाते हा 21 वर्षीय तरुण बळी पडला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा आणि कोपर या स्थानकांदरम्यान चालत्या गाडीतून तोल जाऊन पडल्याने भावेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भावेशने ऑफिसला जाण्यासाठी डोंबिवलीहून सीएसटीला जाणारी ८.५९ ची लोकल पकडली होती. मात्र, डोंबिवली स्थानकावरील प्रचंड गर्दीमुळे भावेशला गाडीच्या डब्यामध्ये पूर्णपणे शिरायला जमले नाही. त्यामुळे भावेश कसाबसा लोकलच्या दरवाजावर लटकत होता. अखेर कोपर-दिवा स्थानकादरम्यान भावेशचा हात सुटल्याने तो चालत्या लोकलमधून खाली पडला. अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी भावेशला डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत भावेशचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 10:56 am

Web Title: 21 year old youth dies after falling from packed rush hour local train in mumbai
Next Stories
1 महाराष्ट्रात तूर्तास सरसकट दारूबंदी अशक्य
2 शीनाच्या राजीनाम्यावर इंद्राणीच्या स्वीय सचिवाची स्वाक्षरी
3 मालगुंड आणि भिलार येथे ‘पुस्तकांचे गाव’! ’गावातील शंभर घरांत पुस्तके ठेवणार ’साहित्यविषयक उपक्रम राबविणार
Just Now!
X