27 October 2020

News Flash

एकाच इमारतीत २२ रुग्ण

इमारतीत १४ दिवसांची टाळेबंदी

(संग्रहित छायाचित्र)

अंधेरी पश्चिम येथील जे. पी. रस्त्यावरील विनायक टॉवर या इमारतीत करोनाचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने या इमारतीत १४ दिवसांची टाळेबंदी केली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या सर्वेक्षणादरम्यान पाहणी करण्यात आली.

यात इमारतीत विनायक टॉवरमध्ये करोनाचे ३ रुग्ण आढळले होते. त्यामुळे इमारतीत आणखी रुग्ण असण्याची शक्यता होती. परिणामी पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागामार्फत इमारतीत करोना चाचणी शिबीर राबविण्यात आले होते. इमारतीतील ४० लोकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. त्यातील १९ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. यानंतर पालिकेने इमारतीत १४ दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे, अशी माहिती पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:32 am

Web Title: 22 patients in one building abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 निवासी संकुलांमध्ये संसर्गात वाढ
2 करोना काळातील विमान प्रवास भाडे परत करण्याचे आदेश
3 करोना रुग्णालयांत आयुष उपचारांना मान्यता
Just Now!
X