पोलीस आणि अन्न व औषध संचालनालयाच्या पथकाने शहरातील औषधे निर्यात करणाऱ्या दोन व्यावसायिकांवर सोमवारी रात्री छापे घालून  रेमडेसिविरच्या २२०० कुप्या जप्त केल्या.

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स आणि पश्चिाम उपनगरातील मरोळ येथील दोन व्यावसायिकांकडे  रेमडेसिविर कुप्या पडून आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने अन्न व औषध संचालनालयातील अधिकाऱ्यांबरोबर रात्री या दोन्ही ठिकाणी छापा घातला. मरिन लाईन्स येथील व्यावसायिकाकडून २०० तर मरोळ येथील व्यावसायिकाकडून दोन हजार  रेमडेसिविरच्या कुप्या जप्त करण्यात आल्या. या दोन्ही व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आली.

रेमडेसिविर उत्पादकांकडून या व्यावसायिकांनी परेदशी निर्यात करण्यासाठी कु प्या विकत घेतल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने  रेमडेसिविरच्या निर्यातीवर बंदी आणल्याने कुप्या व्यावसायिकांकडेच पडून राहिल्या. सध्या करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत  रेमडेसिविरचा तुटवडा असून रुग्णांच्या नातेवाईकांची कुप्या  मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशा परिस्थितीत निर्यातदार व्यावसायिकांनी अन्न व औषध संचानालयाची परवानगी घेऊन रेमडेसिवीरचा साठा स्थानिक वापरासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तसेच राज्य सरकारने आदेश काढून निर्यातदारांवर तसे बंधन घालणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रि या तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताकडे नोंदवली.  पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार मरोळ येथून हस्तगत के लेल्या दोन हजार रेमडेसिविर कु प्या एका औषध उत्पादक कं पनीच्या आहेत. दोन्ही कारवायांमध्ये जप्त के लेल्या कुप्या अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतल्या. पुढील चौकशी व कु प्यांच्या वापराबाबतची कारवाई प्रशासनाकडून केली जाईल.

‘तो’साठा दमणच्या गोदामात !

ब्रुक फार्माच्या संचालकाचा चौकशीत दावा

मुंबई : ब्रुक फार्मा कं पनीच्या संचालकाने रेमडेसिविर कु प्यांचा साठा मुंबईत नसून दमण येथील गोदामात के ल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांनी कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांच्याकडे शनिवारी चौकशी के ली होती.

रेमडेसिविर निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी आणली असली तरी संबंधित कं पनी सुमारे ६० हजार कु प्यांचा साठा निर्यात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांना डोकानिया यांना बोलावले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी पोलिसांकडे असा दावा केला होता की, ब्रुक फार्मा कं पनीने निर्यातबंदीमुळे रेमडेसिविर कु प्यांचा साठा स्थानिक वापरासाठी वळवण्याची परवानगी अन्न व औषध विभागाकडे मागितली होती आणि विभागाने तशी परवानगी दिली आहे.  दरम्यान, विभागाने सोमवारी ब्रुक फार्मा कं पनीला सूचना केली की, वैद्यकीय आणीबाणीत निर्यातीसाठी राखून ठेवलेला साठा स्थानिक वापरासाठी त्वरेने महाराष्ट्र शासनाला वितरित करावा.