मुंबई : बेस्टमधील २३ महिला कर्मचारी करोनामुक्त झाल्या आहेत. बेस्टमधील १,८५० करोनाबाधित कर्मचारी उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १२० कर्मचारी मुंबई व परिसरातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाल्याची माहिती बेस्ट उपक्र माने दिली.

करोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये २३ महिलांचाही समावेश होता. परंतु या महिला पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. बेस्टच्या वाहतूक विभागातील १० महिलांचा यात समावेश आहे. यामध्ये वाहतूक पर्यवेक्षिका, वाहक यांचा समावेश आहे. तसेच वीज विभागातील आठ, अभियंता विभागातील एक आणि अन्य विभागातील चार महिलांचा समावेश आहे.

मालवणी आगारात वाहतूक पर्यवेक्षिका असलेल्या शीला सावंत (५३) यांना कामावर असताना करोनाची लक्षण दिसून आली. २७ ऑगस्टला दहिसर कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल झाल्या आणि दहा दिवस उपचार केल्यानंतर त्या करोनामुक्त झाल्या.