News Flash

मुंबईतील तरुणाचा मुळशी पॅटर्न, २५ व्या वाढदिवशी तलवारीने २५ केक कापले; पोलिसांनी व्हिडीओ पाहिला आणि…

मुंबईतील तरुणाला तलवारीने केक कापणं पडलं महागात

मुंबईतील २५ वर्षीय तरुणाला तलवारीने केक कापणं चांगलंच महागात पडलं आहे. तरुणाने आपल्या २५ व्या वाढदिवसानिमित्त मित्रांना इमारतीच्या गच्चीवर बोलावलं होतं. यावेळी त्याने २५ व्या वाढदिवसानिमित्त तलवारीने २५ केक कापत वाढदिव साजरा केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियमांचं पालनही केलं गेलं नाही. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. हॅरिस खान असं या तरुणाचं नाव आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

हॅरिसने आपल्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मध्यरात्री वांद्रे येथील इमारतीवर ३० मित्रांना बोलावलं होतं. यावेळी त्याने तलवारीच्या सहाय्याने २५ केक कापले. इमारतीवर यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ता मोहसीन शेख यांनी हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं. “मला माझ्या मित्राकडून हा व्हिडीओ मिळाला. यानंतर मी मुंबई पोलीस आयुक्तांना कळवलं. मी ट्विटदेखील केलं आहे,” अशी माहिती मोहसीन शेख यांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी हॅरिस खान आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हॅरिस खान याच्या अनेक मित्रांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नव्हतं. तसंच मास्कही घातलेलं नव्हतं. तलवारीचा वापर केल्याने हॅरिस खानविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे”.

वांद्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीने वापरलेली तलवार आम्ही जप्त केली आहे. आरोपी खान याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पार्टीत उपस्थित इतरांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 1:02 pm

Web Title: 25 year old arrested for cutting cake with sword in bandra mumbai sgy 87
Next Stories
1 आणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश
2 ‘बनवाबनवी थांबवा आणि कृती करा’, किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र
3 “धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं”, उद्धव ठाकरेंना आवाहन
Just Now!
X