27 February 2021

News Flash

पवई बलात्कार : गुन्हा करूनही सुरक्षारक्षक घटनास्थळी कसा?

मद्यधुंद अवस्थेत घरी परतणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर इमारतीच्याच सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

| January 26, 2014 03:11 am

मद्यधुंद अवस्थेत घरी परतणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर इमारतीच्याच सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासत आहेत. मात्र गुन्हा करूनही सुरक्षा रक्षक पळून कसा गेला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
पवई येथे राहणारी २५ वर्षीय तरुणी गुरूवारी रात्री आपल्या मित्र मैत्रिणींसह पार्टीसाठी बाहेर गेली होती. तेथे तिने मद्यपान केले होते. शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास तिला तिच्या मित्रांनी इमारतीखाली सोडले होते. परंतु पहाटे पाचच्या सुमारास ती इमारतीच्या जिन्यावर जखमी अवस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. पवई पोलिसांनी त्या इमारतीचा सुरक्षा रक्षक प्रमोद उपाध्याय (३२) याला अटक केली होती. याबाबत माहिती देताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय.एल.जाधव यांनी सांगितले की आम्ही इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत तसेच तिच्या मित्र मैत्रिणींचे जबाब नोंदवत आहोत. उपाध्यायने तिची बॅग आणि मोबाईल चोरला होता. तो मोबाईल वाहनतळाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवलेला होता. तो पोलिसांनी जप्त केला आहे. पण अद्याप तिची बॅग सापडलेली नाही. आरोपीला १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 3:11 am

Web Title: 25 year old raped by building security guard in powai
Next Stories
1 अखेर आदिवासींनी आरोग्य केंद्र मिळविले
2 रिक्षा चालकांवरचा संशय बळावला इस्थर हत्याप्रकरण
3 श्रीसिद्धिविनायक डायलिसिस केंद्राचे आज उद्घाटन
Just Now!
X