28 October 2020

News Flash

एसटी ‘बेस्ट’च्या सेवेत

मुंबईत २५० एसटी गाडय़ा धावणार

(संग्रहित छायाचित्र)

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई महापालिका एसटीच्या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेणार आहे. वाहनचालकासह २५० गाडय़ा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील. या गाडय़ा बेस्टच्या मार्गावर धावतील.

बेस्टच्या ताफ्यात ३,५०० बसगाडय़ा आहेत. परंतु यातील काही गाडय़ांचे आयुर्मान संपल्याने व भाडेतत्त्वावरही १,२०० पैकी के वळ ४६० गाडय़ाच दाखल झाल्याने बेस्ट पूर्णपणे गाडय़ा चालवू शकत नाही. फक्त ३,२०० ते ३,३०० पर्यंतच गाडय़ा धावतात. बेस्टची प्रवासी संख्या वाढत असून ती १६ लाखांपर्यंत गेली आहे. परिणामी करोनाकाळात बेस्टच्या गाडय़ांना प्रचंड गर्दी होत आहे.

नोकरदारांना मुंबईत येताना होणारा गर्दीचा त्रास पाहून बेस्टच्या मदतीला एसटीच्या अडीचशे गाडय़ा भाडय़ाने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर किलोमीटरमागे ७५ रुपये भाडय़ाने या बस घेण्यात येणार असून त्यातूनच एसटी महामंडळाला इंधन, देखभाल, चालक, वाहकाचा खर्च दिला जाणार आहे. बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी वाढती गर्दी लक्षात घेता पालिकेने पुढाकार घेऊन एसटीच्या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याची सूचना सरकारला केली होती. त्यामुळे आता बेस्टच्या मार्गावर धावताना दिसतील. नुकत्याच एसटी महामंडळानेही १४० अतिरिक्त गाडय़ा मुंबई महानगरात सुरू केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:49 am

Web Title: 250 st bus will run in mumbai abn 97
Next Stories
1 ऑनलाइन वर्गाचे तास ठरविण्याचा अधिकार सरकारचा!
2 पाच पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ
3 राज्यात सहा पोलिसांचा करोना संसर्गाने मृत्यू
Just Now!
X