मुंबई : भिवंडीतील रोशन बाग भागातील दिवान शाह मदरशात शिकणाऱ्या २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ५ मुलांची प्रकृती गंभीर आहे. मदरशात बिर्याणी खाल्यानंतर त्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
#Visuals from Maharashtra: 26 children fell ill last evening after consuming Biryani in Diwan Shah Madrasa in Bhiwandi's Roshan Bagh area, admitted in hospital. 5 children who were critical, referred to Mumbai. pic.twitter.com/0a874ApP3o
— ANI (@ANI) January 18, 2018
या विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉ. अनिल थ्रोटा म्हणाले, काल संध्याकाळी मदरशात बिर्याणी खाल्यानेच त्यांना उलट्यांचा त्रास झाला. कारण या उलट्या ही अन्नातील विषबाधेची लक्षणे आहेत. आमच्या रुग्णालयात या २६ विद्यार्थ्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
26 children were brought here. They were showing symptoms of food poisoning after they had consumed Biryani. 5 were very critical so we referred them to Mumbai: Anil Throta, Doctor pic.twitter.com/38Zvg1hwt7
— ANI (@ANI) January 18, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2018 12:51 pm