News Flash

दोन आठवड्यांत २६ पोलिसांचा मृत्यू 

गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत एकूण ३९० पोलीस करोनाने मृत्युमुखी पडले.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दोन आठवड्यांत करोना संसर्ग झालेल्या २६ अधिकारी, अमलदारांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत एकूण ३९० पोलीस करोनाने मृत्युमुखी पडले.

संसर्ग पसरू नये यासाठी प्राधान्याने पोलीस दलात लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीकरणाचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यातच दुसरी लाट थोपवण्यासाठी लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या अंमलबजावणीची जबाबदारी  पोलिसांवर आली.

ही जबाबदारी पेलताना पोलीस दलातील संसर्ग प्रसार आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वर्षभरात राज्य पोलीस दलातील ३४ हजार ५८७ अधिकारी अंमलदार बाधित झाले. सध्या ३ हजार ७०० जण उपचार घेत आहेत.

तर मुंबई पोलीस दलातील ८ हजार ३७२ अधिकारी, अंमलदार बाधित झाले आहेत. त्यापैकी ७ हजार ५९८ जणांनी करोनावर मात केली. यातील बहुसंख्य अधिकारी कामावर रुजू झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 1:26 am

Web Title: 26 policemen died in two weeks abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांत लस
2 ‘प्राणवायू एक्स्प्रेस’ आज महाराष्ट्रात दाखल
3  …तर धूम्रपानावरही तात्पुरती बंदी हवी!
Just Now!
X