18 September 2020

News Flash

२६०० टॅक्सी परवाने रद्द होणार?

रिकॅलीब्रेशन न करणाऱ्या रिक्षा टॅक्सीवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उभारला असतानाच, नूतनीकरण न करणाऱ्या, टॅक्स न भरणाऱ्या आणि अशा विविध गोष्टीमध्ये दोषी आढळलेल्या २६०० टॅक्सींचे

| December 16, 2012 02:04 am

रिकॅलीब्रेशन न करणाऱ्या रिक्षा टॅक्सीवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उभारला असतानाच, नूतनीकरण न करणाऱ्या, टॅक्स न भरणाऱ्या आणि अशा विविध गोष्टीमध्ये दोषी आढळलेल्या २६०० टॅक्सींचे परवाने रद्द करण्याच्या कारवाईला प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) ताडदेव कार्यालयाने सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त टॅक्सीचालकांना यासंदर्भातील नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टॅक्सीचालकाने परवान्याच्या विहित मुदतीनंतर जास्तीत जास्त सहा महिन्याच्या आत नूतनीकरण करणे गरजेचे असते. पण ‘चलता है’ ची भूमिका घेऊन परवान्याविना, कर न भरता, फिटनेस प्रमाणपत्राशिवाय व इतर अनेक नियम धाब्यावर बसवून टॅक्सीचालक टॅक्सी चालवत असतात. अशा टॅक्सीचालकांना चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नोटीसा बजावल्या आहेत.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2012 2:04 am

Web Title: 2600 taxi licence will going to cancel
टॅग Transport
Next Stories
1 नवी मुंबईचे नगरसेवक विठ्ठल मोरे शिवसेनेत परतले
2 चुनाभट्टी येथे इमारतीचे छत कोसळल्याने चौघे जखमी
3 ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’ सेन्सॉर कट न घेता प्रदर्शित होणार
Just Now!
X