01 March 2021

News Flash

मुंबईत २७ वर्षीय तरुणाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या

पाच दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मित्रांनीच कट रचून मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला ठार केलं. नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश त्याच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करत होता. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे सगळेजण फरार झाले आहेत. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने नितेशला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Mumbai: 27-year-old man killed by 7-8 people during his birthday celebrations last night in Ghatkopar. Police Inspector Pratap Bhosle says, “prima facie, the deceased had an altercation with some people 4 to 5 days ago, & he was killed in connection with that”. #Maharashtra pic.twitter.com/hrMPO44PNX

— ANI (@ANI) July 29, 2019

नितेशला त्याच्या मित्रांनीच कट रचून ठार केलं आहे.  याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नितेशचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्याच वादातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेेने एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नितेशच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्याच दरम्यान ७-८ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि तिथून पळ काढला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 7:25 am

Web Title: 27 year old man killed by 7 8 people during his birthday celebrations last night in ghatkopar mumbai scj 81
Next Stories
1 पुनर्विकसित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी लवकरच तरतूद
2 पालिका शाळेला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यास प्रशासनाचा नकार
3 खोटय़ा गुणपत्रिकांच्या आधारे प्रवेश
Just Now!
X