24 September 2020

News Flash

मुंबईत दोन ठिकाणी २८ लाख रुपये जप्त

मुंबईत शनिवारी रात्री दोन ठिकाणी लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पवईत १८ लाख रुपये तर लालबाग येथे सुमारे लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली

| October 13, 2014 01:22 am

मुंबईत शनिवारी रात्री दोन ठिकाणी लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पवईत १८ लाख रुपये तर लालबाग येथे सुमारे लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे.
शनिवारी रात्री भोईवाडा वाहतूक पोलिसांची लालबाग येथे मद्यपी चालकांविरोधात मोहीम सुरू होती. त्यावेळी एका वाहनात ९ लाख ९६ हजार रुपयांची रोकड सापडली. चालक या रकमेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने त्याला पुढील तपासासाठी भोईवाडा पोलिसांकडे देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बरकडे यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारासाठी ही रोकड आणल्याचे सुत्रांनी सांगितले. तर पवईच्या आयआयटी मार्केट जवळ एका गाडीतही नाकाबंदीच्या वेळी १८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. गाडीमधील सीटच्या खाली पैशांची ही बॅग दडवून ठेवण्यात आलेली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार एल.बी. सिंह यांच्यासाठी ही रक्कम नेली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:22 am

Web Title: 28 lakh seized in mumbai
Next Stories
1 बाजारात वादळ..
2 ..आणि खारघर टोलचा दांडा आडवा झाला
3 नक्षलवादी ठरवून दलित कार्यकर्त्यांचा छळ
Just Now!
X