मुंबई : मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर गुरुवारी २९ प्रवाशांचे अपघात झाले. यात झालेल्या विविध अपघातांत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवासी जखमी झाले आहेत. रूळ ओलांडताना, लोकलमधून पडून यासह अन्य कारणांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज प्रवाशांचे अपघात होत असतात. रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत; परंतु त्यानंतरही या अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर व पश्चिम रेल्वेवर गुरुवारी झालेल्या विविध अपघातांत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कुर्ला, ठाण्यात प्रत्येकी तीन, डोंबिवली, कल्याण प्रत्येकी दोन, वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आणि वसईत प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
First Published on July 20, 2019 12:01 am