25 February 2021

News Flash

कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ ठार, १ जखमी

या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबईतल्या मालाड भागात भिंत कोसळून १३ जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण शहरातही भिंत कोसळली आहे. ही भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला आहे. मुंबईत रात्रभर पावसाचा जोर आहे. त्याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. अशात कल्याण या ठिकाणी भिंत कोसलून तिघांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण या ठिकाणी असलेल्या नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळली आहे. रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. मुसळधार पावसामुळेच ही भिंत खचली आणि कोसळली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 8:15 am

Web Title: 3 dead 1 injured after wall of national urdu school collapsed at around 1230 am today in kalyan scj 81
Next Stories
1 संततधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत
2 पावसाची झोडपणी सुरूच
3 धरणक्षेत्र तहानलेलेच!
Just Now!
X