01 December 2020

News Flash

कामशेत बोगद्याजवळ अपघातात तिघांचा मृत्यू

कामशेत बोगद्याजवळ पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारला भीषण अपघात झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कामशेत बोगद्याजवळ पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला आहे.
मुंबईहून पुण्याला येत असलेल्या एका मोटारीचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोटारीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून यात  अमित श्रीकांत सुळेभालीवर (वय २९, रा. यमुनानगर, निगडी),  संतोष सुरेश वृंदावत (वय ३८, रा. कर्वेनगर, पुणे) शरद कृष्णराव पवार (वय ३५ रा. वारजे माळवाडी, पुणे) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात ठार झालेले तिन्ही जण पुण्याचे असून, ते मुंबईला कामासाठी गेले होते. काम आटोपून पुण्याच्या दिशेने येत असताना गाडीचा महामार्गावरील कामशेत बोगद्याजवळ अपघात झाला. द्रुतगती महामार्गाच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला आय-२० कार (एमएच-१४, डीएफ ५९९४) पहाटे ४ च्या सुमारास धडकली. महामार्ग पोलीस अधिकारी रमेश पोटे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 11:19 am

Web Title: 3 dead in mumbai pune express way accident
Next Stories
1 गृहप्रकल्पांपुढील अडथळे दूर
2 ‘आरे’मध्ये पुरातन अवशेषांचे संशोधन करा
3 रुळांवरील रुग्णसेवेची २५ वर्षे!
Just Now!
X