27 September 2020

News Flash

मुलुंड येथे तिघांची आत्महत्या

सोमवारी मुलुंड येथे नववीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना त्याच रात्री मुलुंडमध्येच एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

| April 30, 2014 01:05 am

सोमवारी मुलुंड येथे नववीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना त्याच रात्री मुलुंडमध्येच एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर मंगळवारी पहाटे मुलुंडमध्ये वृद्धेनेही आत्महत्या केली.
मुलुंड पूर्व येथील साने कॉलनीत राहणाऱ्या योगिता वाच्छानी या तरुणीने सोमवारी रात्री घरात कुणी नसताना आत्महत्या केली. रात्री मोठी बहीण घरी आली असता तिला योगिताचा गळफास लावलेला मृतदेह आढळला. योगिताने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे आदल्या दिवशीच सालपादेवी पाडा येथील गिरीश सरदारा या ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी मुलुंडमधीलच गव्हाणपाडा येथे आजारपणाला कंटाळून उजीबेन चौटालिया या ७२ वर्षीय वृद्धेने गळफास लावून आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2014 1:05 am

Web Title: 3 suicide in mulund
Next Stories
1 संक्षिप्त : मुलुंड येथे नववीच्या मुलाची आत्महत्या
2 मध्य रेल्वेसोबत पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत
3 चिंटू शेखप्रकरणी नीतेश राणेंना दिलासा
Just Now!
X