09 July 2020

News Flash

बेस्टमधील ३० कर्मचारी बडतर्फ

२२ जूनपासून सुरू झालेल्या कारवाईत पहिल्यांदा ११ जणांना बडतर्फ करण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : अत्यावश्यक सेवेकरींना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामावर हजर राहण्याचे आदेश मिळूनही गैरहजर राहणाऱ्या
एकूण ३० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत बेस्ट उपक्र माने बडतर्फ के ले आहे. गेल्या आठवडय़ापासून ही कारवाई सुरू आहे. सोमवारी आणखी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कु ऱ्हाड कोसळली. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक व अन्य कर्मचारी आहेत.

टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्याऐवजी अनेक कर्मचारी गैरहजर राहिले. यात परिवहन सेवेबरोबरच विद्युत, अभियंता, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अशा कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले. परंतु अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष के ले. अशांवर कठोर कारवाई के ली जात आहे.

२२ जूनपासून सुरू झालेल्या कारवाईत पहिल्यांदा ११ जणांना बडतर्फ करण्यात आले. यामध्ये बॅकबे, धारावी, देवनार, दिंडोशी आगारातील चालक-वाहकांचा समावेश होता. चार दिवसानंतर आणखी सात जणांवर कारवाई के ली. मात्र २९ जूनला तब्बल १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याची माहिती बेस्टमधील सूत्रांनी दिली. आणखी काही जणांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:14 am

Web Title: 30 best employee terminated zws 70
Next Stories
1 पालिकेच्या दवाखान्यात प्रतिजन चाचणी
2 किरकोळ दुकानदारांना फटकाच
3 देवनार पशुवधगृह जुलैपासून सुरू
Just Now!
X