News Flash

३० कोटी रुपये, ४० किलो सोने जप्त

प्राप्तिकर विभागाने रोकड आणि दागिने जप्त करण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी घटना

डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवरील छापा प्रकरण

डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर गेल्या आठवडय़ात प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात ३० कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड, किमान ४० किलो सोने आणि सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

या समूहाने रिअल इस्टेट आणि मुदत ठेवींच्या रूपात केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या गुंतवणुकीबाबतचा दस्तऐवजही विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला असून सध्या त्याच्या मूल्यमापनाचे काम सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. प्राप्तिकर विभागाने रोकड आणि दागिने जप्त करण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी घटना आहे, असे सूत्रांनी सांगितले.

डी. वाय. पाटील समूहाच्या अखत्यारीतील शैक्षणिक संस्था विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देताना कॅपिटेशन शुल्क अथवा देणग्या स्वीकारत असाव्यात, असा विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. खासगी शैक्षणिक संस्थांनी कॅपिटेशन शुल्क स्वीकारणे बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा २ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. शैक्षणिक क्षेत्रात व्यापारीकरण आणि पिळवणुकीला मान्यता नाही, संस्थांचा कारभार ना नफा, ना तोटा तत्त्वावरच चालविण्यात आला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.देशातील अनेक शैक्षणिक संस्था कॅपिटेशन शुल्क घेत आहेत. शैक्षणिक संस्था या काळा पैसा निर्माण करण्यात अग्रभागी असल्याचेही करचुकवेगिरीच्या प्रकरणांचे विश्लेषण केले असता निदर्शनास आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:51 am

Web Title: 30 crore rs 40 kg gold seized from d y patil educational institutions
Next Stories
1 ‘ते’ सुखरूप परततील..!
2 ५० मीटर अंतरावरील मृत्यू टळला..
3 कजबुज.. ; अशीही अडचण
Just Now!
X