26 September 2020

News Flash

ख्यातनाम जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

सांताक्रूझमधील वाकोला येथे भूमिका सिंह राहायची. भूमिका सिंह ही एका आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीच्या मुंबई कार्यालयात कामाला होती.

भूमिका सिंह

मुंबईतील सांताक्रूझ येथे जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भूमिका सिंह असे या तरुणीचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सांताक्रूझमधील वाकोला येथे भूमिका सिंह राहायची. भूमिका सिंह ही एका आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीच्या मुंबई कार्यालयात कामाला होती. दोन दिवसांपूर्वी भूमिकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. भूमिकाचा पती विनय सिंह हे घरी परतल्यावर त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. भूमिका सिंहने टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 2:18 pm

Web Title: 30 year old advertising professional bhumika singh commits suicide in santacruz
Next Stories
1 मुंबईकरांचा प्रवास होणार हाय-फाय; लोकलमध्ये WiFi
2 म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी
3 ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन
Just Now!
X