करोनामुळे एसटीतील ३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३१६ कर्मचारी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

आतापर्यंत एसटीच्या ९७० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ६२२ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये एसटीच्या मुंबई ठाणे विभागांतील सर्वाधिक करोना कर्मचारी असल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. करोनामुळे मृत झालेल्या ३२ कर्मचाऱ्यांपैकी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यानंतर ठाणे विभागातील विविध आगारातील कर्मचारी आहेत.

कर्तव्यावर असताना करोनामुळे मृत झाल्यास अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. मात्र अद्याप केवळ सहा कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच ही मदत मिळाली आहे.