20 September 2020

News Flash

आरोग्य भवनातील ३५ जण करोनाबाधित

आठ मजली इमारतीत जवळपास प्रत्येक मजल्यावरील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

प्रतिकात्मक छायाचित्र

संपूर्ण राज्याचा आरोग्याचा कारभार ज्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात असलेल्या आरोग्य भवनातून चालतो, तेथील सुमारे ३५ कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. आठ मजली इमारतीत जवळपास प्रत्येक मजल्यावरील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.

आरोग्य आयुक्त, आरोग्य संचालक, सहसंचालक, उपसंचालक अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत तसेच आरोग्याच्या विविध योजनांचे कामकाज आरोग्य भवनातून चालते.

या कार्यालयात जवळपास ५२५ कर्मचारी व डॉक्टर तैनात होते. यातील सुमारे ३५ जणांना करोनाची लागण झाली असून ५२५ कर्मचाऱ्यांपैकी सध्या केवळ ७० च्या आसपास कर्मचारीच कामावर येत आहेत. यात आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार व आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह २५ डॉक्टरांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:19 am

Web Title: 35 people in arogya bhavan affected by corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाइन रोजगार मेळावे
2 ..तरीही २५व्या आठवडय़ात गर्भपातास परवानगी
3 मोफत प्रवासापोटी शासनाकडून ९० कोटी रुपयांची एसटीला प्रतीक्षा
Just Now!
X